महेंद्र सिंह धोनी बद्दल संपूर्ण माहिती | MS Dhoni information in Marathi
महेंद्र सिंह धोनी बद्दल संपूर्ण माहिती | MS Dhoni information in Marathi
MS Dhoni information in Marathi : महेंद्र सिंह धोनी ह्या नावामुळे क्रिकेट खेळाला एक नवीन ओळख मिळाली. आज भारतातील प्रत्येक व्यक्ती क्रिकेट हा खेळ फक्त महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) मुळे पाहत आहेत. MS Dhoni एक चांगला आणि अष्टपैलू क्रिकेटर म्हणून सर्वत्र जगभर प्रसिद्ध आहे. भारतीय क्रिकेट संघाला सर्वत्र ओळख ही फक्त ह्या एका व्यक्तीमुळे मिळाली.
कसोटी, T-20, एकदिवसीय सामना ह्या सर्वात भारतीय संघाला विजय आणि सर्वात उच्च स्थान मिळवून दिले. पण हे सर्व काही एका रात्रीत झाले नाही, तर हे सर्व मिळवण्यासाठी एम.एस धोनी ला अनेक संघर्षामधुन जावे लागले.
या संघर्षामधुन निघाल्यानंतर तो आज या ठिकाणी आहे. एम एस धोनी ची जीवन कहाणी खूप कठीण होती, पण मेहनत आणि संघर्षाने एम.एस धोनी ने जीवनात खूप काही मिळवले. त्याने जगापुढे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याबद्दल आज जाणून घेऊया
पुर्ण नाव : महेन्द्र सिंग धोनी
जन्म : 7 जुलै 1981, रांची, बिहार (भारत)
उंची : 5 फुट 9 इंच (1.75 मीटर)
पत्नीचे नाव : साक्षी धोनी
मुलगीचे नाव : जीवा
आईचे नाव : देवकी देवी
वडिलांचे नाव : पान सिंह
राष्ट्रीयत्व : भारत
महेंद्र सिंह धोनी विषयी थोडक्यात माहिती (MS Dhoni information Marathi)
महेंद्र सिंह धोनी ने भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार पद (Captain) सप्टेंबर 2007 पासुन 4 जानेवारी 2017 पर्यंत सांभाळले. धोनी ने कसोटी, टी ट्वेण्टी, वन डे ह्या तिन्ही फॉरमॅट मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. तसेच 2008 ते 28 डिसेंबर 2014 पर्यंत माही कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार होता.
त्याचा खेळण्याचा अंदाज, त्याचा शांतपणा, निर्णय घेण्याची क्षमता, माणुसकी, खेलाप्रती असलेली भावना आणि त्याची स्टायलिश हेअरस्टाईल ह्या सर्वांमुळे धोनी हा एक विशेष आणि अनोखा खेळाडू न्हाऊन जगभरात प्रसिद्ध झाला. क्रिकेट मध्ये तसेच जाहिरातींमध्ये धोनी प्रसिद्ध होऊ लागला. धोनी उजव्या हाताचा फलंदाज आणि यष्टिरक्षक आहे.
माही ने भारताच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघाला 2011 साली दुसरा विश्वकप मिळवुन दिला. पुढे 2007 ते 2016 पर्यंत भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावर राहिला. 2008 ते 2014 पर्यंत माही ने कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार पद सांभाळले. त्याच्या खेळातील कौशल्यामुळे त्याने क्रिकेट विश्वात एक नवीन ओळख निर्माण केली.
भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी माही हा एक आहे. ज्यांनी आपल्या संघाचे चांगले नेर्तृत्व केले आणि अनेक सामन्यांमधे भारताला विजय मिळवुन दिला. या व्यतिरीक्त त्यांच्या नेर्तृत्वात अनेक नोंदी देखील आहेत.
इतर लेख नक्की वाचा :
https://creatormarathi.com/confidence-suvichar-in-marathi/
https://creatormarathi.com/life-quotes-in-marathi/
धोनीच्या नेतृत्वाखाली 2009 मध्ये भारतीय क्रिकेट संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आला. तसेच 2007 मधील T-20 वर्ल्ड कप आणि 2011 मधील ODI World Cup धोनीने जिंकवून दिले. त्यासोबत 2013 मधील चॅंपियंस ट्राॅफी सुद्धा माही ने भारतीय संघासाठी जिंकवून दिल्या.
तसेच ह्या सर्व आयसीसी ट्रॉफीज एम एस धोनी च्या नेतृत्वाखाली जिंकण्यात आल्या होत्या. तसेच धोनी हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने ICC च्या तिन्ही फॉरमॅट मधील ट्रॉफी जिंकल्या आहेत.
बीसीसीआय अंतर्गत ठेवल्या जाणाऱ्या आयपीएल (IPL) मध्ये सुद्धा धोनीने उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्स् चे नेतृत्व करत 2010, 2011 मध्ये आणि 2018 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.
महेंद्र सिंग धोनीचे T-20 कारकिर्द (MS Dhoni’s T20 Career)
महेंद्र सिंग धोनीने पहिला टी-20 सामना दक्षिण अफ्रिके विरूध्द खेळला होता. परंतु पहिल्या टी-20 सामन्यात त्याचे प्रदर्शन निराशाजनक राहिले. या सामन्यात धोनी ने केवळ 2 चेंडुंचाच सामना केला आणि 0 वर बाद झाला पण तरी देखील भारतिय संघाने हा सामना जिंकला होता.
आजच्या लेखामध्ये दिलेली महेंद्र सिंह धोनी बद्दल संपूर्ण माहिती (MS Dhoni information in Marathi) तुम्हाला कशी वाटली.